लहान कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करू; कामगार मंत्री Akash Fundkar यांचे प्रतिपादन

51
लहान कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करू; कामगार मंत्री Akash Fundkar यांचे प्रतिपादन
  • प्रतिनिधी

चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक तसेच चित्रपट उद्योगाशी संबंधित कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अन्यायाला विरोध करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्याच्या संदर्भात विधी व न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

(हेही वाचा – Hawker : महानगरपालिकेने जप्त केले २,७६३ अनधिकृत हातगाड्या, सिलिंडर आणि इतर साहित्य )

चित्रपट क्षेत्रातील लहान कलाकारांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल सिने टीव्ही असोशिएशनचे पदाधिकारी मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारासिंग, संजय पांडे, उपासना सिंग यांनी आज मंत्रालयात कामगार मंत्री फुंडकर (Akash Fundkar) यांची भेट घेतली. यावेळी कामगार विभागाचे उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव दीपक पोकळे उपस्थित होते.

(हेही वाचा – Gujarat मधील पाक सीमेजवळील गावात हिंदूंची लोकसंख्या घटली; अहवालानुसार, जमिनींवर मुस्लिमानांचा कब्जा)

कामगार मंत्री फुंडकर (Akash Fundkar) म्हणाले की, राज्यातील लहान कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कलाकारांवर कंत्राटदार किंवा निर्मात्यांकडून होणाऱ्या अन्यायाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच लहान कलाकारांना वेळेवर वेतन मिळावे यासाठी एक ड्राफ्ट तयार करण्यात येणार असून तो लवकरच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.