
-
प्रतिनिधी
राज्यातील नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने “धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ” स्थापन करण्यात आले आहे. हे महामंडळ असंघटित क्षेत्रातील चालकांसाठी आदर्श संस्था ठरेल, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले.
आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी महामंडळाची अधिकृत स्थापना
२७ जानेवारी २०२५ रोजी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या महामंडळाची स्थापना करण्यात आली. राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून याची सुरुवात केली आहे.
सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू
राज्यातील सर्व रिक्षा व टॅक्सी चालकांना ५०० रुपये नोंदणी शुल्क आणि ३०० रुपये वार्षिक वर्गणी भरून सभासद होता येईल. ऑनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ (वेबसाईट) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Congress खासदाराच्या पत्नीचा आयएसआयशी संबंध; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप)
कल्याणकारी योजना आणि लाभ :
- ६५ वर्षावरील चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना – पात्र चालकांना १०,००० रुपयांचा सन्मान निधी दिला जाणार.
- जीवन विमा व अपंग विमा योजना – सभासद चालकांना आरोग्य सुरक्षा प्रदान केली जाणार.
- शिष्यवृत्ती योजना – सभासदांच्या मुलांसाठी आर्थिक मदत दिली जाणार.
- अपघात सहाय्यता योजना – ड्युटीवर असताना दुखापत झाल्यास आर्थिक मदत दिली जाणार.
- बक्षीस योजना – उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सी चालक, संघटना आणि स्टँडसाठी दरवर्षी पुरस्कार दिले जातील.
सामाजिक सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
राज्यातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सुरक्षितता, आर्थिक मदत आणि भविष्याची हमी देणारे हे महामंडळ असंघटित क्षेत्रासाठी आदर्श ठरेल, असे परिवहन मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनराव आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community