सध्या राज्याच्या अनेक भागांत बळीराजा रुसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. अशा काळात दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा –Delhi Liquor Scam : लाच घेतल्याच्या आरोपाखाली ईडी अधिकाऱ्यालाच सीबीआयकडून अटक )
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात ‘वॉर रूम’ची स्थापना करण्यात आली आहे. मंत्रालयातील 7व्या मजल्यावर असलेल्या या वॉर रूममधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेणार आहेत. गाव, तालुके, जिल्हे, विभाग या वॉर रूमशी जोडले जाणार असून त्यांना दुष्काळी परिस्थितून बाहेर काढण्यासाठी आढावा तसेच मदत केली जाणार आहे.
राज्याच्या काही भागांत यंदा दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्य सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. याकरिता विशेष अधिकारी नेमून आढावा घेऊन त्यानुसार निर्णय घेतले जाणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community