पीएमपीएमएल बससाठी ईव्ही चार्जिंग सुविधा

124

पुणे शहर तसेच उपनगरांतील रस्त्यांवर प्रदूषणात घट होण्यासाठी आणि पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस जास्त प्रमाणात वापरात आणण्याचे पुणे महापालिकाचे धोरण आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील चऱ्होली येथील अ‍ॅमॅनिटी स्पेस येथे इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बस चार्जिंगसाठी ईव्ही चार्जिंग उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणी उच्चदाब वीजपुरवठ्याशी संबंधित कामे करण्यात येणार आहेत. यासाठी 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

( हेही वाचा : केंद्र सरकार देणार दिवाळी गिफ्ट; LPG सिलेंडर स्वस्त होणार? )

इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढणार 

पीएमपीच्या बस डेपोत इलेक्ट्रिक बसेससाठी अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. तसेच इलेक्ट्रिक बसेस बरोबरच खासगी ई-वाहनांनाही याठिकाणी चार्जिंग करता येईल, असे नियोजन करण्यात येणार आहे. ई-बसेस हिंजवडी माण फेज 3, गोखलेनगर, आळंदी, विश्रांतवाडी, लोहगाव, मांजरी बु., रांजणगाव कारेगाव, खराडी, विमाननगर, कोंढवा खुर्द, साळुंके विहार, चिंचवड गाव, शेवाळेवाडी या मार्गांवर धावणार आहेत. पुणे स्टेशन डेपोमध्ये बसेसच्या चार्जिंगसाठी 45 AC/DC चार्जर बसविलेले आहेत. पुणे शहर आणि उपनगरात सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस धावत असून लवकरच त्यांची संख्या वाढणार आहे. त्यातील अधिकाधिक बसेस या उपनगरांत धावणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.