दारुचा एक थेंबही देतो ‘कर्करोगा’ला आमंत्रण; WHO चा इशारा

171

अनेकांना अती प्रमाणात मद्यपान करण्याचे व्यसन जडलेले असते. तर थोडी दारू घेतली कर काही होत नाही असे म्हणत अनेकजण नियमित मद्यपान करत असतात. परंतु थोडी दारु घेणा-यांना WHO ने मोठा इशारा दिला आहे.

एक थेंब दारुही शरीरासाठी घातक ठरु शकते. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने दारुच्या सेवनाबाबत नवीन संशोधन केले. यात हा दावा करण्यात आला आहे. दारु अती प्रमाणात घ्या अथवा कमी प्रमाणात घ्या ती आरोग्यासाठी धोकादायकच असल्याचा इशारा WHO ने दिला आहे. WHO च्या नवीन अहवालानुसार, अल्कोहोलचा एक थेंबदेखील कर्करोगाचा धोका निर्माण करु शकतो.

थोड्या प्रमाणात दारु पिणे देखील हानीकारक

अति प्रमाणात दारुचे सेवन केल्याने शरीराला हानी पोहोचते. त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात दारु पिणे देखील हानीकारक असल्याचे WHO चे युरोपमधील क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी डाॅ कॅरिना फरेरा- बोर्जोस यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; प्रस्तावावर मंत्रिमंडळाची मोहोर

दारुच्या व्यसनामुळे 7 प्रकारच्या कर्करोगांचा धोका

दारुच्या व्यसनामुळे 7 प्रकारचे कर्करोग होऊ शकतात, असा इशारा WHO ने दिला आहे. यामध्ये कोलन कर्करोग, स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग आणि अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची भीती आहे. त्याशिवाय दारुच्या अतिसेवनाने किडनी तसेच लिव्हर खराब होण्याचा धोका असतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.