Marathi Sign Board : अद्यापही सुमारे दोन हजार दुकानांच्या पाट्यांवर मराठी नाहीच

दुकानांवरील नावाच्या पाट्या मराठी भाषेतून करण्याबाबत न्यायालयाने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर आजवर १९३२ दुकानांनी अद्यापही याची अंमलबजावणी केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

424
Marathi Sign Board : अद्यापही सुमारे दोन हजार दुकानांच्या पाट्यांवर मराठी नाहीच
Marathi Sign Board : अद्यापही सुमारे दोन हजार दुकानांच्या पाट्यांवर मराठी नाहीच

दुकानांवरील नावाच्या पाट्या मराठी भाषेतून करण्याबाबत न्यायालयाने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर आजवर १९३२ दुकानांनी अद्यापही याची अंमलबजावणी केली नसल्याची माहिती समोर आली आहे. मागील २८ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये एकूण ४२,७७५ दुकानांना भेटी देण्यात आल्या आहे, यातील ४०, ८४३ दुकानांचे नामफलक मराठीतून लावले गेल्याचे आढळून आले आहे. परंतु या कालावधीमध्ये अद्यापही १९३२ दुकानांनी सर्वेच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही मराठीतून पाट्या लावण्याची कार्यवाही केली नसल्याचे स्पष्ट केले. (Marathi Sign Board)

मुंबईतील दुकानांच्या पाट्या देवनागरी भाषेत प्रदर्शित करण्यासाठी शासनाने निर्णय घेतल्यानंतर महापालिकेच्यावतीने या दुकानांविरोधात कार्यवाही करण्यात आली आहे. महापालिकेच्या या मोहिमेला काही दुकानदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही दुकानदारांची कानउघडणी करत त्यांना दुकानांच्या पाट्या मराठीत करण्याची मुदत दिली. ही मुदत २२ नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आल्यानंतर मराठी पाट्या न लावणाऱ्या हजारो दुकानदारांविरोधात महापालिकेच्यावतीने मोहिम हाती घेण्यात आली. त्यामध्ये पहिल्या दिवशी ३, २६९ दुकानांना भेटी देण्यात आल्या, त्यामध्ये ३,०९३ दुकानांमध्ये मराठी पाट्या प्रदर्शित करण्याची कार्यवाही करण्यात आल्याचे आढून आले. मोहिमेच्या पहिल्या दिवशी केवळ १७६ दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात आल्या नसल्याचे आढळून आले होते. (Marathi Sign Board)

(हेही वाचा – Weapons Cache Seized : मुसाफिरखान्यात हत्यारांचा जखीरा जप्त, एकाला अटक)

१९३२ दुकानांवर मराठीतून पाट्या नाहीत 

तर १५ डिसेंबर रोजी २,८२० दुकानांना भेटी देण्यात आल्या, त्यात २७२८ दुकानांवर मराठी पाट्या दिसून आल्या. तर केवळ ९२ दुकानांवर मराठी पाट्या लावल्या नसल्याचे आढळून आले. त्यामुळे २८ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये एकूण ४२,७७८ दुकानांना भेटी देण्यात आल्या. त्यामध्ये ४०, ८४३ दुकानांवर मराठी भाषेतील पाट्या लावलेल्या आढळून आल्या असून या कालावधीमध्ये १९३२ दुकानांवर मराठीतून पाट्या लावल्या नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे २८ नोव्हेंबर पासून हाती घेतलेल्या या मोहिमेत देवनागरी भाषेतून पाट्या नसलेल्या दुकानांची सुख्या कमी प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे ज्या दुकानांच्या पाट्या मराठीतून नाही त्यांना या पाट्या देवनागरी भाषेतून करेपर्यंत दंडात्मक कारवाईची प्रक्रिया केली जाते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Marathi Sign Board)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.