मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेच्या विभाग कार्यालयांसह विविध यंत्रणांनी युध्दपातळीवर हाती घेतले असले तरी मागील ४० दिवसांमध्ये मुंबईतील विविवध भागांमध्ये तब्बल २३६ खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातील १८३ खड्डे बुजवण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यातील १५२ खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात खड्डे बुजवल्याची आकडेवारी लक्षात घेता मुंबईच्या रस्त्यांवर आजही ८४ खड्डे विविध भागांमधील रस्त्यांवर पहायला मिळत आहे.
मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये एकूण १९५ खड्डयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. तर महापालिकेसह इतर विभाग व प्राधिकरणांच्या हद्दीमध्ये ३७ खड्डयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तर २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये १९५ खड्डयांच्या तक्रारींपैकी १७५ खड्डे बुजवण्याचे नियोजन केले आहे, त्यातील १४५ खड्डे निश्चित करण्यात आली आहे. त्यातील १३८ खड्डे बुजवण्यात आले आहे. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर दोन तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर ५ तसेच गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर १ अशाप्रकारे ८ खड्डयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील पाच खड्डे केवळ बुजवण्यात आले असून उर्वरीत तीन खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
महापालिकेच्या दाव्यानुसार संपूर्ण मुंबईत जून पासून आजमितीस २३६ खड्डयांच्या तक्रारीनुसार १८३ खड्डयांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यातील १५२ खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यातील १४४ खड्डे बुजवण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरीत पैंकी ५३ खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरु असून आजमितीस केवळ ८ खड्डेच बुजवण्याचे शिल्लक असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
(हेही पहा – अपात्रतेचा निर्णय घेण्याच्या कालमर्यादेचे बंधन कोणी घालू शकत नाही – राहुल नार्वेकर)
सर्वांधिक खड्डे असलेले प्रभाग
पी उत्तर मालाड : ४५ खड्ड्यांची तक्रारी, बुजवलेले खड्डे ४१
आर मध्य विभाग बोरीवली : २५ खड्डयांच्या तक्रारी, बुजवलेले खड्डे १३
के पश्चिम विभाग, अंधेरी जोगेश्वरी पश्चिम : २१ खड़्डयांच्या तक्रारी, बुजवलेले खड्डे ३
जी उत्तर, दादर माहिम धारावी : १४ खड्डयांच्या तक्रारी, बुजवलेले खड्डे १३
ई विभाग, भायखळा विभाग : ०९ खड्डयांच्या तक्रारी, बुजवलेले
हेही पहा –
Join Our WhatsApp Community