प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये हवेत हे ५ अ‍ॅप्स! झटपट होतील सरकारी कामे

अलिकडे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट उपलब्ध असते. स्मार्टफोनमध्ये आपण आपल्या आवडीचे विविध अ‍ॅप्स डाऊनलोड करतो. भारत सरकारनेसुद्धा नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध केले आहेत. या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्हाला अगदी सहज सरकारी योजनांचा फायदा घेता येईल. यामुळे तुमची अनेक महत्त्वाची कामे अगदी सहज होऊ शकतात. हे अ‍ॅप्स जर तुमच्या मोबाइलमध्ये असतील तर तुमची सरकारी कामे सुद्धा अगदी झटपट होऊ शकतात. या अ‍ॅप्सविषयी आपण जाणून घेऊया…

डिजीलॉकर (Digilocker)

डिजीलॉकर या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही सरकारी कागदपत्र डिजीटली तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करू शकता. या अ‍ॅपमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, मार्कशीट, सरकारी कागदपत्र स्टोर करू शकता. कागदपत्र स्कॅन करून अपलोड करण्यासाठी यात १ जीबी अतिरिक्त स्टोरेज देण्यात आले आहे.

एमपरिवहन (mParivahan)

या अ‍ॅपला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (INC) द्वारे तयार करण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला जवळच्या RTO कार्यालयांची माहिती मिळेल. तसेच याद्वारे तुम्हाला क्षेत्रीय परिवहन कार्यालय आणि वाहनांची माहिती मिळते. या अ‍ॅपवरून तुम्ही मॉक ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टसाठी अर्ज करू शकता.

एमपासपोर्ट ( mPassport)

परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट सेवांसाठी या अ‍ॅपला सेवेत आणले आहे. या अ‍ॅपद्वारे नागरिक पासपोर्ट संबंधित सेवांचा लाभ घेऊ शकतात. याद्वारे पासपोर्ट सर्विस, पासपोर्ट अर्ज, अर्जाची स्थिती इत्यादी माहिती मिळते.

उमंग ( Umang)

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती सूचना मंत्रालयाने राष्ट्रीय ई-गव्हर्नेंस डिव्हिजनसोबत मिळून हे अ‍ॅप तयार केले आहे. याद्वारे ईपीएफओ, सिलेंडर संबंधित कामे नागरिक करू शकतात.

युपीआय अ‍ॅप ( BHIM UPI App)

या अ‍ॅपला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कोणालाही काही क्षणांत पैसे पाठवू शकता. क्यूआर कोड, बॅंक ट्रान्सफर, अकाउंट नंबर, IFSC कोड, MMID कोडसह तुम्ही पैसे पाठवू शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here