कार्तिकी एकादशी निमित्तानं गुरुवारी पहाटे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा केली. कार्तिकीच्या निमित्तानं संपन्न झालेल्या या महापुजेसाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या वत्सला घुगे आणि बबन घुगे या शेतकरी दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याची संधी मिळाली. आपल्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सोहळाच असल्याची प्रतिक्रिया यावेळी या मानाच्या वारकऱ्यांनी दिली.
यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी “महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं आहे, तसेच, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी,” असं साकडं विठुराया चरणी घातलं आहे.
।। आनंदाचे डोही आनंदतरंग ।।
(कार्तिकी वारी, पंढरपूर |22-11-2023)#Maharashtra #Pandharpur #Solapur #KartikiWari #विठ्ठल #Vitthal #warkari pic.twitter.com/OTLIjyuvpX
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 22, 2023
(हेही वाचा – Dev Uthani Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी यंदा कधी साजरी करावी ? )
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
“वारकरी कुठल्याही परिस्थितीत पंढरीच्या दिशेनं चालत राहिले, त्यामुळेच कुठलाही कुकर्मा आमचा हा विचार संपवू शकला नाही. महाराष्ट्र धर्म हा वारकऱ्यांनी जिवंत ठेवला. माणसं बदलली तरी श्रद्धा बदललेली नाही, विकास आराखडा आपण केला आहे, आधी मंदिराचं संवर्धनाचं काम पाहिजे, अशी आपली भूमिका होती. 75 कोटी रुपयांच्या कामाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज झालं आहे. पुरातत्व विभागाला मला सांगणं आहे की, कोट्यावधी लोकांच्या भावना यासोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे हे काम उत्तम आणि लवकरात लवकर झालं पाहिजे. पंढरपूर विकास आराखडा हा सर्वांना सोबत घेऊन करायचा आहे.” (Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Dev Uthani Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी यंदा कधी साजरी करावी ? )
इंद्रायणी स्वच्छ आणि अविरत वाहिली पाहिजे
पुढे बोलतांना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की; “कोणाला विस्थापित करायचा आमचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाव नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आमची वारी ही आता आमची वारी राहिली नाही, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली आहे. त्यामुळे इथे व्यवस्था देखील त्याच पद्धतीनं उपलब्ध असली पाहिजे. इंद्रायणी स्वच्छ आणि अविरत वाहिली पाहिजे, यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी वेळ लागेल मात्र आपण सुरुवात केली आहे. इंद्रायणीमध्ये सोडलं जाणारं पाणी हे स्वच्छ करूनच त्यामध्ये गेले पाहिजे, यासाठी प्रयत्न आपण सुरू केले आहेत.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community