दोरीवरून सायकल चालवणाऱ्या आजीबाईंना पाहून सगळे झाले अवाक!

147

असं म्हणतात की वय ही केवळ एक संख्या असते. हे फक्त बोलण्यापुरते मर्यादित नसून काही लोक ते सत्यात उतरून दाखवतात. ६७ वर्षांच्या आजीने असाच पराक्रम केला आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यात दिसणार्‍या आजीबाईंनी सर्वांचं मन जिंकलं आहे.

yathrikan_200 या इन्स्टा अकाऊंटवरुन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. व्हिडिओ सुरु होताच आपल्याला एक वृद्ध महिला दिसते, जिने हेल्मेट घातलं आहे. ती सायकल चालवताना आपल्याला दिसते. आता तुम्ही म्हणाल ह्यात काय खास आहे? अहो, पण ही आजी दोरीवरुन सायकल चालवतेय. तिच्या या धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

वय खूप असल्यामुळे आणि कोणतीही इजा होऊ नये म्हणून या महिलेने सेफ्टी उपकरणे घातली आहेत. महत्वाचं म्हणजे उंचावरुन ही महिला सायकल चालवतेय. ६७ वर्षांच्या या महिलेचा जोश पाहून असं वाटतं की एखादी नुकतीच वयात आलेली मुलगी ही करामत करुन दाखवतेय.

(हेही वाचा ‘आरे’ तील वृक्षतोडीला राज्य सरकारने याचिकाकर्त्यालाच ठरवले जबाबदार)

सायकल चालवणार्‍या आजीचा व्हिडिओ इथे पाहा:
https://www.instagram.com/reel/CohoXopjt-Z/?utm_source=ig_embed&ig_rid=df2653ec-177e-49b3-92e6-35ecfc84e71e

या व्हिडिओत आपल्याला स्पष्ट दिसत आहे की या महिलेच्या चेहर्‍यावर भिती नाही. ती बिनधास्तपणे सायकलस्वारीचा आनंद घेतेय आणि तिचं हे धाडस पाहून अनेक वापरकर्त्यांची तिचं कौतुक केलं आहे. आपण ठरवलं तर आयुष्यात काहीही करु शकतो, त्यासाठी वयाची अट नसावी हा संदेश या वृद्ध महिलेने सर्वांना दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.