वातावरणीय बदल कमी करण्यास प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित- उद्यान अधीक्षक

77
बदलत्या वातावरणात हवेतील वाढत चाललेले कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण हा खूप चिंतेचा विषय आहे व मुंबईतील प्रत्येक व्यक्तीने जर सहकार्य केले तर वातावरणातील कार्बन डायऑक्सईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी व्यक्त केला.
नागरिकांमध्ये पर्यावरणविषयी जबाबदारीची जाणीव होऊन सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. येणाऱ्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नुकताच टी विभागातील हरी ओमनगर, मुलुंड पूर्व येथील नालंदा पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत महापालिकेच्या उद्यान खात्याच्या टी विभागातील अधिकारी यांनी ‘ट्री-वॉक’ उपक्रम राबवला. या जनजागृतीपर कार्यक्रमात ते बोलत होते.
New Project 2022 05 26T092550.859

विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी उपक्रम

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी उद्यान विभागामार्फत नेहमीच  वेगवेगळी जनजागृती अभियाने व कृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यासाठी विविध शाळा, कॉलेज ,स्वयंसेवी संस्था ,गृह निर्माण संस्था यांना या कार्यक्रमात सामील करून सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचे काम या माध्यमातून करण्यात येते, जेणेकरून यावेळी विद्यार्थ्यांना आपली पर्यावरण रक्षणासाठी जबाबदारी तसेच वृक्ष संजीवनी अभियान व मियावकी पद्धतीने तयार करण्यात आलेल्या जंगलाबाबत माहिती देण्यात आली.
इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत ऑक्सीजनचे प्रमाण अधिक
जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण देशाने पर्यावरणाबाबत पुढाकार घेण्यासाठी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहात साजरा केला जातो. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग हा पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी नेहमीच अग्रेसर असतो. मुंबईसारख्या औद्योगिक व सिमेंटीकरणाच्या जंगलात पर्यावरणाचे संवर्धन व जतन करणे खूप जोखमीचे काम आहे, परंतु हे काम उद्यान विभाग यशस्वी करून दाखवत आहे, इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत मुंबईच्या वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण जास्त आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.