‘NASA’च्या माजी अंतराळवीराकडून भारताचे तोंडभरून कौतुक; म्हणाले…

143
'NASA'च्या माजी अंतराळवीराकडून भारताचे तोंडभरून कौतुक; म्हणाले...
'NASA'च्या माजी अंतराळवीराकडून भारताचे तोंडभरून कौतुक; म्हणाले...

भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशावर अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश बनला. केवळ ‘चांद्रयान-३’ नव्हे, तर गेल्या २० वर्षांत भारत अवकाशात खूप यशस्वी झाला आहे. जगभरात भारताच्या प्रयत्नांचा आदर केला जात आहे. मंगळावरील मिशन ही पहिलीच वेळ होती, जेव्हा एखाद्या देशाने पहिल्याच प्रयत्नात मंगळाची परिक्रमा पूर्ण केली होती. भारताने गेल्या वर्षी चंद्रावर यशस्वी पाऊल ठेवले. जगाच्या इतिहासात भारताने असे काही केले, जे आजपर्यंत कोणीही केलेले नाही,” अशा शब्दांत नासाचे (NASA) माजी अंतराळवीर स्टीव्ह ली स्मिथ (Steve Lee Smith) यांनी इस्रोच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

(हेही वाचा – World Championship of Legends final : टीम इंडियाने पाकिस्तानला धूतलं; ५ विकेट्सने फायनल जिंकली!)

भारताने चांद्रयान-३ चे ही मोहिम यशस्वी केली. अंतराळ क्षेत्रातील भारताच्या या कामगिरीचे जगात कौतुक होत आहे. नासाचे माजी अंतराळवीर स्टीव्ह ली स्मिथ (Steve Lee Smith) यांनीही नुकतेच भारताचे कौतुक केले आहे.

रशिया, जपान आणि अमेरिका यांना मागे टाकले

स्टीव्ह ली स्मिथ पुढे म्हणाले की, “अवघ्या काही महिन्यांत मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी भारत स्वतःचे कॅप्सूल तयार करत आहे. त्यांनी त्यांच्या अंतराळवीरांची नावेही उघड केली आहेत. भारतीय अंतराळवीर भारतीय अंतराळयानातून अंतराळात जातील अशी अपेक्षा आहे. रशिया, जपान आणि अमेरिका यासारख्या अंतराळ दिग्गजांना मागे टाकून चांद्रयान-3 चांद्रयान मिशन साध्य करणे हे भारताचे ‘धाडसी’ पाऊल होते. त्यांची उद्दिष्टे आणि अथक परिश्रमाची मानसिकता खूपच कौतुकास्पद आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.