Exam : स्थगित दुय्यम अभियंता स्थापत्य पदाची परीक्षा येत्या १३ आणि १४ मे २०२५ रोजी होणार

3081
Exam : स्थगित दुय्यम अभियंता स्थापत्य पदाची परीक्षा येत्या १३ आणि १४ मे २०२५ रोजी होणार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

महानगरपालिकेतील अभियांत्रिकी संवर्गातील दुय्यम अभियंता (स्थापत्य) संवर्गाची ऑनलाइन परीक्षा (Exam) काही तांत्रिक कारणापुढे स्थगित केल्यानंतर आता सुधारित वेळापत्रकानुसार येत्या १३ मे २०२५ आणि १४ मे २०२५ रोजी घेण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे. या संवर्गातील अन्य पदांच्या ऑनलाईन परीक्षा (Exam) यापूर्वीच पार पडल्या आहे. परंतु परीक्षा केंद्र लांब असल्यामुळे याबाबत तक्रारी आल्याने महापालिका प्रशासनाने दुय्यम अभियंता स्थापत्य पदाची परीक्षा (Exam) तात्पुरती स्थगित केली होती.

(हेही वाचा – Dhananjay Munde यांची याचिका फेटाळली; करुणा शर्मा यांच्या बाजूने न्यायालयाचा निर्णय)

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभियांत्रिकी संवर्गातील एकूण ६९० रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षांचा (Exam) कालावधी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातील, दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची ९ मार्च २०२५ रोजी नियोजित ऑनलाईन परीक्षा (Exam) होती, जी तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता येत्या १३ मे २०२५ आणि १४ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.