BMC च्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठी मंगळवारी १० डिसेंबर रोजी परीक्षा

1936
Air Quality Index : मुंबईतील २८ बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उल्लंघन, महापालिकेच्या लेखी सूचना
Air Quality Index : मुंबईतील २८ बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उल्लंघन, महापालिकेच्या लेखी सूचना
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठी मंगळवारी १० डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा होणार आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामधील विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांच्या नोंदणीकृत ई मेल तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रवेशपत्राबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी वेळापत्रकानुसार संबंधित केंद्रावर निश्चित वेळेत उपस्थित राहावे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. (BMC)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule यांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले…)

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक संवर्गातील १७८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून १९ सप्टेंबर २०२४ पासून २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. एकूण मिळून २५ हजार ४७५ अर्ज महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. (BMC)

(हेही वाचा – Congress आखतेय मोठा डाव, माजी राजदूताचा खळबळजनक दावा)

पात्र उमेदवारांसाठी १० डिसेंबर २०२४ रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी तीन सत्रांमध्ये (सकाळी ०९.०० ते ११.००, दुपारी ०१.०० ते ०३.०० आणि सायंकाळी ०५.०० ते ०७.००) परीक्षा होणार आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरीता आवश्यक असलेल्या प्रवेशपत्राबाबतच्या (Hall Ticket) सूचना उमेदवारांच्या नोंदणीकृत ‘ई-मेल’ वर तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर ‘एसएमएस’ द्वारे कळविण्यात येणार आहे. उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचून पुढील कार्यवाही करावी, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.