मंगळवारपासून २ हजारांच्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. रिझर्व्ह बँकने नोटा बदलण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. एका वेळेला बँकेत २० हजार रुपयांपर्यंत २ हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकता. तसेच बँकेतील खात्यामध्ये २ हजाराची नोट जमा करण्यासाठी कोणतीची मर्यादा नाहीये. परंतु यासाठी बँकेत ठेवीचे नियम पाळावे लागतील.
कोणताच अर्ज भरण्याची गरज नाही
रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की, २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणताही अर्ज भरावा लागणार नाही. तसेच ओळखपत्राचीही गरज भासणार नाही. तुम्ही एकावेळी २ हजार रुपयांच्या १० नोटा बदलू शकता. चलनातून बाहेर काढलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबर २०२३पर्यंत बदलता येतील. नोटा बदलण्याच्या प्रक्रियेबाबत आरबीआयच्या सूचनेनुसार सर्व बँकांनी आपली तयारी पूर्ण केली आहे.
(हेही वाचा – G20 : श्रीनगर येथे केंद्रीय मंत्री रेड्डी, डॉ. जितेंद्र सिंह करणार तिसऱ्या G20 पर्यटन बैठकीचे उद्घाटन)
ज्यांचे बँकेत खाते नाही त्यांच्यासाठी….
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून कोणतीही व्यक्ती एकावेळी २० हजार रुपयांपर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात. म्हणजे बँकेत खाते असणे गरजेचे नाही. आणि नोट बदलण्याची सुविधा निशुल्क आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community