मद्यसाठा घेऊन धावणाऱ्या अज्ञात वाहनाचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (Excise Department) सरकारी वाहन उलटल्याचा प्रकार चांदवड-मनमाड रोडवरील हरनुल टोलनाक्याजवळ घडला.
(हेही वाचा – Raigad Rain : रायगडावर ढगफुटी! मुसळधार पावसामुळे पर्यटक गडावर अडकले, पाहा व्हिडीओ)
वाहनाने कट मारल्याने अपघात
मद्यसाठा घेऊन धावणाऱ्या अज्ञात वाहनाचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (Excise Department) सरकारी वाहन चांदवड-मनमाड रोडवरील हरनुल टोलनाक्याजवळ उलटले. मद्यसाठा घेऊन संशयास्पदरित्या धावणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने हा अपघात झाला. अपघातात राज्य उत्पादन शुल्कचा एक कर्मचारी जागीच ठार तर दोघे पोलीस (Police) जखमी झाले आहेत. पोलिसांकडून त्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. (Nashik Accident)
काय आहे प्रकार ?
मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात राज्याकडून नाशिककडे (Nashik) मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या अज्ञात क्रेटा वाहनाचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्कॉर्पिओ वाहनातून पाठलाग सुरु होता. या वेळी संशयास्पदरित्या धावणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाचे नियंत्रण सुटले आणि वाहन अचानक उलटले. या अपघातात एक चालक कर्मचारी जागीच ठार झाला. कैलास गेनू कसबे (50, रहाणार नाशिक) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. राहुल पवार हा पोलीस कर्मचारी या घटनेत गंभीर जखमी झाला. तर आणखी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. जखमी राहुल पवार यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community