Excise Department : बनावट मद्यनिर्मिती आणि बेकायदेशीर मद्य वाहतूक व विक्री रोखण्याचे मोठे आव्हान असलेल्या उत्पादन शुल्क विभागाने (Pune Excise Department) पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातून तब्बल तीन हजार कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत महसुलात 9.85 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर 2023-24 मध्ये महसूल 2 हजार 729 कोटी 44 लाखाच्या घरात होता. (Excise Department)
एकीकडे अवैध मद्यनिर्मिती (Illegal brewing), विक्री आणि वाहतुकीला लगाम, तर दुसरीकडे महसूल वाढीसाठी प्रोत्साहन देत पुणे राज्य बनावट शुल्क विभागाने चालू आर्थिक वर्षात 2 हजार 729 कोटी 44 लाखाचा महसूल सरकारी तिजोरीत जमा केला आहे. तसेच मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यासंदर्भातल्या गुन्ह्यांचे अन्वेषण करण्याचीही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाकडे असते.
(हेही वाचा – महाराष्ट्रात Waqf Board ची ५० टक्के जमीन अतिक्रमित; जिओ मॅपिंगद्वारे बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांना दणका देणार)
तसेच दारूनिर्मितीसह परराज्यातून छुप्या पद्धतीने जिल्ह्यात येणारी कोट्यवधींची दारू जप्त केली. अनेक गावठी दारूअड्ड्यांवर कारवाई करून आरोपींना अटकदेखील केली. या सर्व कारणांमुळे उत्पादन शुल्कच्या महसुलात वाढ झाली आहे. ही कामगिरी उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य आयुक्त डॉ. राजेश देशमुख (Commissioner Dr. Rajesh Deshmukh), जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे उत्पादन शुल्क विभागाने केली आहे
6 हजार गुन्हे, 5 हजार 800 आरोपींना बेड्या
एप्रिल 2024 ते मार्च 2025 दरम्यान, अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री करणार्यांविरुद्ध 5 हजार 995 गुन्हे दाखल केले असून, 5 हजार 891 आरोपींना अटक केली आहे. तसेच 621 वाहने जप्त करून 25 कोटी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गुन्हे अन्वेषणाची कामगिरी 40 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.
(हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah शनिवारी रायगड दौऱ्यावर; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?)
569 अनुज्ञप्तीविरुद्ध गुन्हे दाखल, 4 कायमच्या बंद
निर्धारित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 569 अनुज्ञप्तीविरुद्ध विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामधील चार अनुज्ञप्ती कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. विभागीय विसंगती प्रकरणामध्ये 1 कोटी 86 लाखांचा दंड अनुज्ञप्तीधारकांकडून वसूल केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community