हिंदु धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. यंदाचा गुढीपाडवा हा निर्बंधमुक्त असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे.
( हेही वाचा : हे आहेत व्हॉट्सअॅपचे नवे भन्नाट फिचर्स! )
मागील जवळपास दोन वर्षांपासून राज्य कोरोनाच्या प्रभावाखाली होते. २१ मार्च २०२० पासून राज्यात निर्बंध घातले होते. त्यानंतर दोन वर्षांत हे निर्बंध कधी कडक तर कधी शिथील करण्यात येत होते, अखेर ३१ मार्च २०२२ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. आता राज्य निर्बंधमुक्त झाले आहे. म्हणूनच यंदा नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. मुंबई आणि पुण्यातील शोभायात्रांची शान काही वेगळीच असते. गिरगाव, डोंबिवली, पुणे याठिकाणी गुढीपाडव्याला मिरवणुका निघतात.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा…
कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे…, अशा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे…”
सर्वांना 'गुढीपाडवा' आणि 'मराठी नववर्षा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!#GudhiPadwa pic.twitter.com/bl8kxrZCa4— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 2, 2022
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो, आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. असे ट्वीट करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Communityगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो.
आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. pic.twitter.com/E0ocwJ3czA
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2022