Vikroli : विक्रोळीत आईसह मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना घरात कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट किंवा संशयास्पद आढळून आलेले नाही.

143
Chhattisgarh: विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू, विषारी वायू गळतीमुळे गमावला जीव; एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले...
Chhattisgarh: विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू, विषारी वायू गळतीमुळे गमावला जीव; एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले...
आईसह मुलाचा रविवारी रात्री विक्रोळीतील राहत्या घरात मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत बेडरूममध्ये तर आई घरातील हॉलमधील बेडवर मृतावस्थेत मिळून आले आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी प्राथमिक तपासावरून अपमृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसानी दिली.
उमा संजय तावडे (५४) आणि अभिषेक तावडे (२२) असे मृतावस्थेत मिळून आलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. उमा तावडे आणि अभिषेक हे दोघे विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर क्रमांक २ गुलमोहर इमारत येथे दुसऱ्या मजल्यावर राहण्यास होते. उमा यांचा पती संजय हा मागील काही वर्षांपासून वेगळा धारावी येथे काम करून मित्राच्या घरी राहण्यास होते, तर उमा नजीकच्या एका खाजगी क्लिनिक मध्ये कामाला होत्या, व अभिषेक हा घरीच असायचा, तो काहीसा मनोरुग्णासारखा होता अशी माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी दिली.
उमा तावडे यांचा पती आठवड्यातून एक दोन वेळा कुटुंबांना भेटण्यासाठी विक्रोळी येत असे, नेहमी प्रमाणे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पती संजय हे घरी आले घराच्या दाराला आतून कडी लावलेली होती, पती संजय यांनी बराच वेळ दार ठोठावले परंतु आतून काही हालचाल होत नसल्यामुळे त्यांना संशय आला व त्याने पोलिसांना कळवले.
विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी देखील दार उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही आतून दार उघडत नसल्यामुळे अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने दार तोडून आत प्रवेश केला असता उमा तावडे मृत अवस्थेत हॉलच्या बेडवर पडलेल्या होत्या, व मुलगा अभिषेक हा बेडरूममध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आला अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन राजवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना घरात कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट किंवा संशयास्पद आढळून आलेले नाही, मुलगा अभिषेक याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासा वरून स्पष्ट होत असले तरी उमा तावडे यांच्या मृत्यु कशामुळे झाला याबाबत गूढ निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासावरून विक्रोळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरू असल्याची माहिती वपोनि.शुभदा चव्हाण यांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.