पुण्यात विसर्जन सोहळ्याचा उत्साह!

पुण्यात मोठ्या उत्साहात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सकाळी दहा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली.

( हेही वाचा : अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने ३ हजार ५०१ कोटींची मदत)

कसबा गणपती मंडळ

ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीत आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रभात बॅंड, कामायणी प्रशाला, बँक ऑफ इंडिया आणि रोटरी क्लबची पथके आहेत. चांदीच्या पालखीत विराजमान झालेली गणरायाची मूर्ती हे प्रमुख वैशिष्ट्य होते. आता मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन झाले आहे.

तांबडी जोगेश्वरी मंडळ

श्री तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांचा नगारा आणि न्यू गंधर्व बॅंड पथक आहे. तसेच विष्णू नाद हे शंख वादकांचे पथक, पारंपरिक पेहेरवतील अश्वारूढ कार्यकर्ते मिरवणुकीत आहेत.

गुरुजी तालिम मंडळ

मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालिम मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सरपाले बंधू यांनी साकारलेल्या भक्ति रथातून निघाली आहे. या रथावर फुलांच्या सजावटीसह विठ्ठल राखुमाई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिकृती आहे.

तुळशी बाग मंडळ

फुलांच्या आकर्षक सजावटीने साकारलेल्या रथामध्ये तुळशी बाग मंडल या मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक निघाली आहे. लोणकर बंधूंचा सनई आणि नगारा वादन येथे अग्रभागी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साकारलेला विशेष रथ सुद्धा मिरवणूकीत आहे.

केसरी वाडा गणपती

मानाच्या पाचव्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत बीडवे बंधू यांचे नगारा वादन आहे. फुलांनी सजवलेल्या रथामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here