मुंबई महापालिकेच्या (BMC) कर्मचाऱ्यांना मराठा सर्वेक्षणाच्या (Maratha survey) कामासाठी नियुक्त करण्यात आले असून आता याबरोबरच आरोग्यसेविकांवरही याची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. मात्र, आरोग्यसेविका या महापालिकेच्या कर्मचारी नसल्याने तसेच त्यांना स्मार्ट फोन वापरण्याचे ज्ञान नसल्याने त्यांना हे काम देण्यात येऊ नये, अशी मागणी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने केली आहे. (BMC)
मुंबई महानगरपालिकेतील (BMC) विविध विभागातील, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह प्रमुख खात्यांमधील विविध पदांवरील अभियंत्यांना मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याबाबत नेमणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, शासनाच्या निर्देशानुसार मुंबईतील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या कामांसाठी महापालिकेच्या सुमारे २५ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश काढण्यात आले आहे. सुरुवातीला हे काम महापालिकेच्या अभियंत्यासह इतर कर्मचाऱ्यांना दिले असून आता घाईघाईत प्रगणकाचे काम आरोग्यसेविकांना दिले असल्याची बाब महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना निवेदन देत आरोग्यसेविकांना मराठा सर्वेक्षणाच्या (Maratha survey) कामासाठी नियुक्त करण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. (BMC)
…तरीही त्यांनी काम करावे
या सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्यसेविकांना त्या महापालिकेच्या कर्मचारी असल्याचे सांगत ते ही कामे करण्यास नकार देऊ शकत नाही, असे सांगितले जाते. परंतु दुसरीकडे या आरोग्य सेविका महापालिकेच्या कर्मचारी नसून त्यांना प्रसुती रजा मिळू शकत नाही असे असे प्रशासनाकडून सांगण्यात येते, तर मग या आरोग्यसेविका महापालिकेच्या कर्मचारी आहेत किंवा नाही हे प्रशासनाने स्पष्ट करावे, असे देवदास यांनी स्पष्ट केले. (BMC)
महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या ऍड. विदुला पाटील यांनी या मराठा सर्वेक्षणासाठी (Maratha survey) प्रगणकाचे काम करण्यासाठी दहा हजार रुपये देणार असे सांगितले. प्रशिक्षणासाठी ५०० रुपये देणार असे सांगितले. परंतु अचानक प्रशिक्षणास बोलविले तर ५०० रुपये देण्यास नकार दिला. प्रशिक्षणाच्या वेळी दहा हजार रुपये नाही तर प्रत्येक घराच्या मागे १० रुपये देण्यात येणार आहेत असे सांगितले. पण त्यासाठी ५० ते ६० प्रश्न विचारावे लागणार आहेत. मोबाईल, पॉवर बँक तुमच्याच पैशाने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्यसेविकामध्ये वरिष्ठ नागरिक आहेत. मोबाईल हाताळण्याचे ज्ञान त्यांना नाही, तरीही त्यांनी ते काम केलेच पाहिजे असे बजावण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. (BMC)
(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला कारसेवकांचा सत्कार)
मोबाईलचे प्रशिक्षण देण्यात यावे
एकूणच मोबदला किती देणार या बाबत अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. अशा तऱ्हेने आरोग्यसेविकांची ही फसवणूक आहे अशी त्यांची धारणा झाली आहे. अधिकारी सांगतात की काम करून घेणे त्यांचे काम आहे. मोबदल्या बाबत आम्हाला विचारू नका असे सांगितले जाते. ऍड. प्रकाश देवदास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वॉर्ड प्रतिनिधींच्या सभेमध्ये काही निर्णय घेण्यात आले. या बैठकीत या कामासाठी किती मोबदला देणार आहेत व तो मोबदला देण्याची जबाबदार कोण असेल ते लेखी स्वरूपात देण्यात यावे. (BMC)
तसेच मोबाईल हँडसेट देण्यात यावा व ऑनलाईन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. याशिवाय ज्या आरोग्यसेविका कमी शिकलेल्या आहेत, त्यांना मोबाईल ऑनलाईन काम करण्याचे अनुभव नाही. त्यामुळे त्यांना हे काम देण्यात येऊ नये, अशी विनंती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आल्याचे सरचिटणीस ऍड. विदुला पाटील यांनी म्हटले आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community