भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर आणि महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, मराठवाडा मुक्ती संग्राम व भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित ०३ दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन सिद्धार्थ गार्डन येथे करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन रविवारी (१५ सप्टेंबर) खासदार, भागवत कराड, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन विकास मंत्री, अतुल सावे (Atul Sawe) व जिल्हाधिकारी, दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. (Photo Exhibition)
यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र जोगदंड, सिद्धार्थ गार्डन उद्यान अधिकारी, विजय पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, डॉ. मिलिंद दुसाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यपिका, डॉ. मंगला बोरकर, महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी, तौसीफ अहमद, साईसेवा बहुविध प्रतिष्ठान व राजमाता जिजाऊ विद्यालय व महाविद्यालयचे अध्यक्ष साईनाथ जाधव व भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार आदी उपस्थित होते. (Photo Exhibition)
(हेही वाचा – शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निर्णय घेतले जातील – PM Narendra Modi)
मराठवाडा मुक्ती संग्राम व भारतीय स्वतंत्र लढ्यातील दुर्मिळ अशा मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनातून तरुण प्रेरणा घेतील असे प्रतिपादन अतुल सावे (Atul Sawe) यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे आदर्श घेऊन तरुण आपले कार्य करतील. भारतीय स्वातंत्र्य लढा व मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याची अत्यंत संक्षिप्त स्वरूपात व दुर्मिळ अशा छायाचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेल्या या प्रदेशास सर्व नागरिकांनी भेटी द्याव्यात असे आवाहनही सावे (Atul Sawe) यांनी केले. दिलीप स्वामी यांनी यावेळी या मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती व इतिहास या विष मौलिक माहिती दिली. (Photo Exhibition)
कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाच्या पंजीकृत शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच, छत्रपती संभाजीनगर यांनी स्वातंत्र्य लढ्यातील पोवाडे व गीतांचे सादरीकरण केले. ही चित्र प्रदर्शनी दिनांक १५ ते १७ सप्टेंबर २०२४ (०३ दिवस) सकाळी ०९ ते सायं ०६ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुली असेल व या चित्रप्रदर्शनीला भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहे. प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाये यांनी आपल्या प्रस्ताविकातून प्रदर्शनाची रूपरेषा सांगितली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी प्रदीप पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगरचे प्रिती पवार, शरद सादिगले यांनी विशेष परिश्रम घेतले. (Photo Exhibition)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community