एमएमआरडीएच्या माध्यमातून वांद्रे कुर्ला संकुलातील एमटीएनएल जंक्शन पासून बांधण्यात आलेला पूल हा लालबहादूर शास्त्री जंक्शनच्या १०० मीटर आधी सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवरील पुलाला विलीन होतो. परंतु या मार्गावरील पुलाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना अनेकदा बीकेसीतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून या पुलाचे विस्तारीकरण एलबीएस रोडपर्यंत करून घाटकोपरकडे जाणाऱ्या मार्गावर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवरील एलबीएस रोडवरील पुलाचे विस्तारीकरण करण्यात येणार असून यामुळे या बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या आता कायमचीच निकाली निघणार आहे.
पूर्व उपनगरातील ‘एल’ विभागात एम. एम. आर. डी. ए. मार्फत बी. के. सी. येथील एम. टि. एन. एल जंक्शन पासुन बांधण्यात आलेला पूल हा एल. बी. एस. जंक्शनच्या सुमारे १०० मीटर आधी सांताक्रुझ चेंबुर लिंक रोड यावरील सध्या अस्तित्वात असलेल्या पुलामध्ये विलिन होतो. एम. एम. आर. डी. ए. मार्फत बांधण्यात आलेल्या या पूलाचे विस्तारीकरण एल. बी. एस. रोड पर्यंत करुन घाटकोपर कडे जाणाऱ्या मार्गास जोडण्यात यावा अशी मागणी स्थानिकांमार्फत करण्यात येत होती. त्यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकामामुळे बि. के. सी. मधुन येणाऱ्या वाहनांना ३ सिग्नल टाळून एल. बी. एस. रोड मार्गे घाटकोपरकडे जाणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल, असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा – Mani Shankar Aiyar : काँग्रेस नेता मणिशंकर अय्यर यांच्या अडचणीत वाढ)
या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आली आहे. यामध्ये बुकॉन इंजिनिअर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी २९ कोटी ३८ लाख रुपये खर्च होणार आहे. या कंपनीने तब्बल २५ टक्के उणे दराने हे कंत्राट मिळवले आहे. प्रशासनाच्यावतीने या कामांचा खर्च ३६ कोटी ५० लाख रुपये एवढा निश्चित करण्त आला होता. या पुलाचे काम पुढील २४ महिन्यांमध्ये करणे अपेक्षित आहे. तर या पुलाच्या कामासाठी टेक टॅन्जंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या सल्लागार कंपनीलाही ५४ लाख ८३ हजार एवढे सल्लागार शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community