दोन जकात नाक्यांच्या सल्लागारांवरच २० कोटींचा खर्च: या कामांसाठी नेमले सल्लागार

107

मुंबई महापालिकेच्या जकात नाक्यांच्या जागांवर परिवहन आणि व्यावसायिक केंद्र बनवण्यात येणार असल्याने आता यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात येत आहे. एकूण पाच जकात नाक्यांपैकी दहिसर आणि मानखुर्द येथील जकात नाक्यांच्या जागांवर केंद्र उभारण्यासाठी आता सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे.

यासाठी सल्लागाराची नेमणूक

मुंबईत वस्तू व सेवा कराची आकारणी करण्यात आल्याने महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणारा जकात कर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील पाचही जकात केंद्र बंद झाली असून, या बंद जागांच्या ठिकाणी परिवहन आणि व्यावसायिक केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी दहिसर व मानखुर्द या दोन जागांवर पथदर्शी प्रकल्प हे केंद्र बनवण्यात येत आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.

(हेही वाचाः मुंबई बनविणार सुंदर! आदित्य ठाकरेंचा संकल्प)

महापालिका वास्तूशास्त्रज्ञांची माहिती

परिवहन संकुलात आंतरराज्य बस सेवा व त्या अनुषंगाने लागणाऱ्या व्यावसायिक जागा, किरकोळ विक्री गाळे, मनोरंजनाच्या जागा, आरोग्य सुविधा केंद्र, सीएनजी व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आदींची सुविधा पुरवली जाणार आहे. यासाठी वास्तूशास्त्रीय सल्लागार, वित्तीय सल्लागार, प्रकल्प अभियंता, बांधकाम व्यवस्थापक, वाहतूक व्यवस्थापक सल्लागार आदी तज्ज्ञ एकत्रितरित्या महापालिकेत उपलब्ध नसल्याने सल्लागाराची नेमणूक करण्याची गरज असून, त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त केले जात असल्याची माहिती महापालिका वास्तूशास्त्रज्ञांनी दिली आहे.

मानखुर्द जकात नाका :

एकूण क्षेत्रफळ : २९००० चौरस मीटर

सल्लागार- सोवील लिमिटेड आणि ऑरकॉम संयुक्त भागीदार

कंत्राट किंमत : सुमारे सहा कोटी रुपये

(हेही वाचाः मुंबईतील अवयवदानाला तरुणांची पाठ! रुग्णासाठी चंदीगढहून आणले हृदय)

दहिसर जकात नाका :

एकूण क्षेत्रफळ : १८०० ० चौरस मीटर

सल्लागार : सोवील लिमिटेड आणि ऑरकॉम संयुक्त भागीदार कंपनी

कंत्राट किंमत : सुमारे १५ कोटी रुपये

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.