मुंबईत विविध सेवा सुविधांचे जाळे टाकण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या चरी बुजवण्याच्या मंजूर करून दिलेल्या ३८३ कोटी रुपयांचा निधी संपल्याने एकूण कंत्राट कामांच्या सुमारे १५० टक्के एवढा निधी वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे एकूण कंत्राट कामांच्या १५ टक्के निधी मंजूर करण्यात आला असून त्याअंतर्गत पूर्व उपनगरातील एक आणि पश्चिम उपनगरातील दोन परिमंडळांमधील खोदलेले चर बुजवण्यासाठी सुमारे २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (BMC)
मुंबईत विविध सेवा सुविधांचे जाळे टाकण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या चरी बुजवण्याच्या कामांसाठी फेब्रुवारी २०२२ रोजी ३८३ कोटी रुपयांच्या कामांसाठी स्थायी समितीने मंजुरी दिली होती. त्यासाठी प्रत्येक महापालिका परिमंडळ निहाय नियुक्त केलेल्या सात कंत्राटदारामार्फत विविध कामांसाठी खोदण्यात आलेले चर बुजवण्याची कामे केली जात आहे. मात्र, या कंपनीचा कालावधी तीन वर्षांचा असला तरी प्रत्यक्षात मंजूर केलेल्या कामाचा निधी संपला गेला आहे. (BMC)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार)
मुंबईमध्ये सध्या गृहविभागाच्या माध्यमातून सीसी टिव्ही कॅमेरा बसवण्याचे काम सुरु असून त्यासाठी केबल्स टाकण्याचे काम लार्सन अँड टुब्रो अर्थात एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून सुरु आहे. महाराष्ट्र शासनासाठी मुंबईत राबवित असलेल्या सीसीटिव्ही फेज-२ प्रकल्पातंर्गत पूनर्भरणी (रिइंटस्टेटमेंट चार्जेस) शुल्क हा एल ऍन्ड टी या कंपनीला माफ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. हे शुल्क माफ करतानाच यावर महापालिकेच्यावतीने केला जाणारा खर्च भागवण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूदही रस्ते विभागाच्या माध्यमातून केली आहे. या सीसी टिव्ही कॅमेरांचे जाळे पसरवण्याच्या कामामुळे हा निधी संपला असल्याची माहिती रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (BMC)
त्यामुळे यासाठी सुमारे ५७३ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करून घेण्याचा घाट कंत्राटदारांनी घातला होता. त्यामुळे चर बुजण्याच्या कामांचे हे एकूण कंत्राट ९४१ कोटींवर पोहोचणार होते. परंतु अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांनी ही बाब अत्यावश्यक नसल्याने यासाठी नव्याने निविदा मागवून त्यासासाठी कंत्राटदारांची नेमणूक करता येऊ शकते. त्यामुळे नव्याने निविदा मागवण्यासाठी १५ टक्क्यांपर्यंतचा निधीपर्यंतचा खर्च करण्यास मान्यता देत यासाठीची निविदा मागवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार परिमंडळ पाचमध्ये आठ कोटी रुपये, परिमंडळ सहासाठी ४ कोटी रुपये आणि परिमंडळ सात साठी ११ कोटी रुपये याप्रमाणे २३.८५ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी मंजूर केलेल्या ३८३ कोटी रुपयांच्या तुलनेत आता सुमारे २४ कोटी रुपयांनी निधी वाढवून दिल्यामुळे चर बुजवण्याचे एकूण कंत्राट रक्कम ही ४०७ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. (BMC)
(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधींचे भाषण; व्यासपिठावर नेत्यांच्या डुलक्या)
अशाप्रकारे तीन परिमंडळांसाठी चर बुजवण्यासाठी वाढवून दिला निधी
परिमंडळ पाच : एचव्ही कंट्रक्शन, (पूर्वीचे कंत्राट रक्कम ५४ कोटी रुपये, वाढीव रक्कम ८ कोटी रुपये)
परिमंडळ सहा : मानसी कंट्रक्शन, (पूर्वीचे कंत्राट रक्कम २७ कोटी रुपये, वाढीव रक्कम ४ कोटी रुपये)
परिमंडळ सात : महावीर कंट्रक्शन कंपनी, (पूर्वीचे कंत्राट रक्कम ७८ कोटी रुपये, वाढीव रक्कम ११कोटी रुपये) (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community