फोडणी महागणार! या देशामुळे संपूर्ण जग खाद्यतेल टंचाईच्या उंबरठ्यावर

103

रशिया -युक्रेन युद्धामुळे जगभरात महागाई वाढली आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंडोनेशिया या देशाने खा्दय तेल निर्यातीवर बंदी घातली आहे. ही निर्यातबंदी 28 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. इंडोनेशियाने तेल निर्यातीला बंदी घालून, संपूर्ण जगाला धक्का दिला आहे.

सर्वच खाद्यतेलांच्या निर्यातीवर बंदी

रशिया युक्रेन युद्धामुळे वाढलेली महागाई आणि वाढत्या किमती यामुळे इंडोनेशियाने तेल निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात सुरु असलेल्या ‘पीक संरक्षण वादा’ला त्यामुळे आणखी बळ मिळाले आहे. जगातील एकूण वनस्पती तेल निर्यातीपैकी एक तृतीयांश निर्यात एकटा इंडोनेशिया करतो. त्यामुळे इंडोनेशियाच्या खाद्यतेल निर्यात बंदीचा मोठा फटका जगाला बसणार आहे. इंडोनेशियाकडून खाद्यतेल आयात करणा-या देशांत चीन आणि भारत यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पामतेलाच्या निर्यातीच्या बंदीचा निर्णय घोषित करतानाच, इंडोनेशियाने त्यापुढे जात सर्वच प्रकराच्या खाद्यतेलांच्या निर्यातीवर बंदी जाहीर केली आहे.

( हेही वाचा: आता बेस्टमध्येही करता येणार रिझर्व्हेशन )

भारतावरील परिणाम

  • ग्राहकोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थ यांची निर्मिती करणा-या कंपन्यांची मिळकत घटणार
  • ब्रेड, बिस्किटे, चाॅकलेट, साबण, सौंदर्यप्रसाधने महागणार
  • पामतेल चढ्या भावात उपलब्ध झाल्यास चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एफएमजीसी कंपन्यांची मिळकत घटणार
  • खाद्यतेलांचे भाव वाढतील, ज्यामुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडणार

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.