Jalgaon : गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये स्फोट; चालकामुळे वाचले रुग्णाचे प्राण

97
Jalgaon : गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये स्फोट; चालकामुळे वाचले रुग्णाचे प्राण
Jalgaon : गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये स्फोट; चालकामुळे वाचले रुग्णाचे प्राण

गरोदर महिलेला घेऊन येणाऱ्या १०८ या ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना धरणगाव येथे घडली. बुधवार, १३ नोव्हेंबरच्या रात्री ९:१५ ते ९:३० वाजताच्या दरम्यान महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या पुलावर घडली. (ambulance accident) या घटनेत वाहनाच्या चिंधड्या होऊन त्याचे अवशेष दीडशे फूट उंच उडाले, तर तब्बल ५०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचे हादरे बसले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ॲम्बुलन्समधील रुग्ण, नातेवाईक, डॉक्टरांचे प्राण वाचले. अग्निशमन दलाच्या दोन बंबांद्वारे आग विझविण्यात आली.

(हेही वाचा – Violation of Code of Conduct च्या ५ हजार तक्रारी; ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त)

धरणगाव येथून एम.एच.१४ सी.एल.०७९६ ही १०८ ॲम्बुलन्स गरोदर महिलेला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात येत असताना महामार्गावरील गुजराल पेट्रोलपंपाच्या उड्डाणपुलाजवळ गियर बदल करत असताना आगीची ठिणगी उडाली. चालक राहुल बाविस्कर याने तत्परतेने वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहनातील डॉ. रफिक अन्सारी, रुग्ण आणि नातेवाईक या सर्वांना खाली उतरविले. त्याच वेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये बसवून त्यांना रुग्णालयात रवाना केले. हे वाहन काही अंतरावर पुढे सरकताच ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा जोरात स्फोट झाला आणि वाहनाच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. आगीच्या ज्वाला आणि सिलिंडर दीडशे फूट उंचापर्यंत उडाले. फुटलेले सिलिंडर रस्त्याच्या दुसऱ्या कडेला, तर रिकामे असलेले सिलिंडर वाहनाजवळ पडले. पुलाच्या खाली वाहनाचा पत्रा उडाला.

बघणाऱ्यांचा उडाला थरकाप

स्फोट व आगीचे दृश्य इतके भयंकर होते की बघणाऱ्यांचाही थरकाप उडत होता. आवाजामुळे निमखेडी शिवारापर्यंत भूकंपासारखे धक्के बसले. यामुळे झोपलेले वृध्द लोकही जागे झाले. या घटनेमुळे महामार्ग बंद झाला होता. ज्या ॲम्बुलन्सचा स्फोट झाला, ती दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यात होती, अशी माहिती १०८ चे व्यवस्थापक राहुल जैन यांनी दिली. सुदैवाने त्या वेळी काही घटना घडली नाही. एक सिलिंडर ऑक्सिजनने भरलेले होते, तर दुसरे रिकामे होते. भरलेल्या सिलिंडरचे स्फोटामुळे तुकडे-तुकडे झाले आहेत. (Jalgaon )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.