अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया केलेले खाद्यान्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण बास्केट अंतर्गत रेडी टू इट(आरटीई), रेडी टू कूक (आरटीसी) आणि रेडी टू सर्व्ह (आरटीएस) सारख्या ग्राहकांसाठी तयार खाद्यपदार्थ उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या एक दशकात लक्षणीय वाढ झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने निर्यातीसाठी उत्पादनांच्या मूल्यवर्धनावर भर दिल्याने, ‘रेडी टू इट’ प्रकारातील खाद्यपदार्थ उत्पादनांनी गेल्या एका दशकात 12 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) नोंदवला आहे आणि याच कालावधीत अपेडा (APEDA) निर्यातीतील आरटीईचा हिस्सा 2.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
अधिक पटींनी वाढली मागणी
2011-12 ते 2020-21 या कालावधीत रेडी टू इट (आरटीई), रेडी टू कुक (आरटीसी) आणि रेडी टू सर्व्ह (आरटीएस) या प्रकारातील खाद्यपदार्थ उत्पादनांच्या निर्यातीत 10.4 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) नोंदवण्यात आला आहे. भारताने 2020-21 मध्ये 2.14 अब्ज डॉलर्सपेक्षा पेक्षा जास्त किंमतीच्या तयार खाद्यपदार्थ उत्पादनांची निर्यात केली. तयार खाद्यपदार्थ उत्पादने वेळेची बचत करणारी आणि सहज उपलब्ध होत असल्याने, आरटीई ,आरटीसी आणि आरटीएस या प्रकारातील खाद्यपदार्थांची मागणी अलीकडच्या काळात अनेक पटींनी वाढली आहे.
आघाडीच्या 10 मध्ये भारताचा समावेश
आरटीई, आरटीसी आणि आरटीएस या प्रकारातील खाद्यपदार्थ उत्पादनांची निर्यात एप्रिल- ऑक्टोबर (2020-21) मधील 823 दशलक्ष डॉलर्सच्या तुलनेत एप्रिल – ऑक्टोबर (2021-22) मध्ये 23% पेक्षा जास्त वाढून 1011 दशलक्ष डॉलर्स झाली आहे.हे लक्षात घेता, मागील तीन वर्षातील आरटीई /आरटीसी आणि आरटीएस या प्रकारातील खाद्यपदार्थांची निर्यात खालील आलेखामध्ये दर्शविण्यात आली आहे.
रेडी टू सर्व्ह (आरटीएस) प्रकारातील खाद्यपदार्थांनी 2018-19 मध्ये 436 दशलक्ष डॉलर्स, 2019-20 मध्ये 461 दशलक्ष डॉलर्स आणि 2020-21 मध्ये 511 दशलक्ष डॉलर्स इतकी निर्यात नोंदवली. ‘रेडी टू ईट’ खाद्यपदार्थ प्रकाराअंतर्गत समाविष्ट असलेल्या उत्पादनांमध्ये बिस्किटे आणि मिठाई, गूळ, धान्यापासून तयार केलेला नाश्ता, वेफर्स, भारतीय मिठाई आणि अल्पोपहार, पान मसाला आणि सुपारी इत्यादींचा समावेश आहे.2020-21 मधील ‘रेडी टू ईट’ खाद्यपदार्थ निर्यातीत बिस्किटे आणि मिष्टान्न तसेच भारतीय मिठाई आणि अल्पोपहाराचा 89% इतका मोठा वाटा आहे. 2020-21 या वर्षात साधारणपणे 56 टक्के पेक्षा अधिक ‘रेडी टू इट’ खाद्यपदार्थ आघाडीच्या 10 निर्यातदार देशांमध्ये निर्यात करण्यात आले. अमेरिका हा तयार खाद्य उत्पादनांच्या चारही प्रकारांच्या निर्यातीत सर्वात पुढे आहे. 2020-21 मध्ये ‘रेडी टू इट’ खाद्य उत्पादनांची मुख्य़ निर्यात करणाऱ्या देशांचे तपशील, अमेरिका 18.73, संयुक्त अरब अमिरात (8.64%), नेपाळ (5%), कॅनडा (4.77%), श्रीलंका (4.47%), ऑस्ट्रेलिया (4.2%), सुदान (2.95%), ब्रिटन (2.88%), नायजेरिया (2.38%), सिंगापूर (2.01%).
( हेही वाचा: कोरोना काळातही ‘या’ उत्पादनाच्या निर्यातीने गाठला उच्चांक! )
या खाद्य उत्पादनाच्या निर्यातीत वाढ
‘रेडी टू इट’ खाद्य उत्पादनांच्या वाढीचा एकूण वार्षिक दर गेल्या दशकात 7 टक्क्यांनी वाढता राहिला. याच कालावधीत कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) च्या एकूण निर्यांतीमध्ये ‘रेडी टू इट’ खाद्य उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण 1.8 टक्क्यांवरून 2.7 टक्क्यांवर गेले आहे. ‘रेडी टू इट’ खाद्य उत्पादने या श्रेणीखाली येणारे मुख्य पदार्थ म्हणजे फक्त शिजवून तयार होणारे खाद्यपदार्थ, पापड, पीठे व दळलेले पदार्थ, पावडर व स्टार्च. या पदार्थांचे निर्यातीमधील प्रमाण याप्रमाणे, रेडी-टू-कूक 31.69%, पापड 9.68%, पीठे व दळलेले पदार्थ 34.34% तसेच पावडर व स्टार्च 24.28%. 2020-21 मध्ये खाद्य़उत्पादनांचे प्रमुख निर्यातदार देश आहेत, अमेरिका 18.62 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, मलेशिया (11.52 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), संयुक्त अरब अमीराती (8.75 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), इंडोनेशिया (7.52 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), ब्रिटन (7.33 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), नेपाळ (5.89 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), कॅनडा (4.31 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), ऑस्ट्रेलिया ( 4.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), बांग्लादेश (3.43 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आणि कतार (USD 2.76 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स).
Join Our WhatsApp Community