शुक्रवारी रात्री माटुंगा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघाताचा फटका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शनिवारी झालेल्या पोलीस उपनिरिक्षक पदाच्या परीक्षेला बसणा-या परीक्षार्थींना बसला. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी येणा-या परीक्षार्थींना उशीर झाला. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत.
पुन्हा संधी दिली जावी
मागच्या तब्बल 4 ते 5 वर्षे अभ्यास करुन परीक्षेची तयारी केलेल्या पोलीस परीक्षार्थींना त्यांची चुकी नसताना, परीक्षेला मुकावे लागले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची काहीही चूक नसल्याने त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
( हेही वाचा राज्यात एक किलोमीटर रस्त्यावर सरासरी 128 वाहने…वाहनकराचे कोट्यावधी रुपये गेले तरी कुठे ? )
लोकलच्या गोंधळाने उशीर
250 पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवारी 16 एप्रिलला पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा मुंबईसह महाराष्ट्रातील 7 जिल्हा केंद्रांवर घेण्याचे ठरले होते. तब्बल 4 वर्षांनी होणा-या या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रवार दीड तास आधी पोहोचण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पण लोकलचा गोंधळ असल्याने, परीक्षार्थींना केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. एल्फिन्स्टन केंद्रावर कल्याणसारख्या ठिकाणहून येणारे विद्यार्थी सकाळी 7 ला निघूनही वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकल्याने, 18 ते 20 पोलीस परीक्षार्थींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे आता हे विद्यार्थी परीक्षा रद्द करुन पुन्हा नियोजन करण्याची मागणी करत आहेत.
Join Our WhatsApp Community