पनवेल-कर्जत दुहेरी मार्गावरील चिखले पुलाचे लोखंडी गर्डर बसविण्याचे काम बुधवारी, (१० एप्रिल) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस- वेवरील पुण्याकडे जाणारी मार्गिका ३ तास बंद राहणार आहे. त्यामुळे अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. (Express Way Block)
कळंबोली सर्कल (Kalamboli Circle) येथून टी-पॉइंट, करंजाडे, पळस्पेमार्गे जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुढे जाता येणार आहे. प्रवाशांनी तीन तासांकरिता या अन्य मार्गावरील वाहतुकीच्या पर्यायाचा अवलंब करावा, असे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community