भारतातून बुधवारी, 9 मार्च रोजी चुकून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडले होते. भारताने या घटनेबद्दल खेद व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भारतीय क्षेपणास्त्रामुळे नुकसान झाल्याचे सांगितले होते.
नुकसान झाले पण जीवितहानी नाही
पाकिस्तानी सैन्याधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार बुधवारी, 9 मार्च रोजी एक भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरले आणि ते मियाँ चन्नू भागात कोसळल्याने त्या भागात थोडे नुकसान झाले आहे. याबद्दल भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या अपघातामध्ये जीवितहानी झालेली नसल्याने ही एक दिलासादायक गोष्ट असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा राज्याचा 24 हजार 353 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प)
तांत्रिक बिघाडामुळे हे क्षेपणास्त्र अपघाताने प्रक्षेपित
भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार 9 मार्च 2022 रोजी नेहमीच्या देखभाल प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हे क्षेपणास्त्र अपघाताने प्रक्षेपित झाले. भारत सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून या प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या भागात हे क्षेपणास्त्र पडले आहे. ही दुर्घटना अत्यंत खेदजनक असून या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली ही दिलासादायक बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community