रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ दोन विशेष ट्रेनच्या कालावधीत वाढ

83

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई आणि रीवा तसेच पुणे आणि जबलपूर दरम्यान धावणाऱ्या उत्सव विशेष ट्रेन्सचा कालावधी पुढीलप्रमाणे वाढवेल:

१) पुणे – जबलपूर विशेष

  • 02131 पुणे – जबलपूर अतिजलद विशेष दि. १५.८.२०२२ पर्यंत प्रत्येक सोमवारी चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २६.९.२०२२ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • 02132 जबलपूर – पुणे अतिजलद विशेष दि. १४.८.२०२२ पर्यंत प्रत्येक रविवारी चालवण्यासाठी अधिसूचित आता दि. २५.९.२०२२ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

(हेही वाचा – युद्धनौका INS विक्रमादित्य जहाजाला आग, बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश)

२) मुंबई – रीवा विशेष

  • 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रीवा अतिजलद विशेष दि. २९.७.२०२२ पर्यंत प्रत्येक शुक्रवारी चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. ३०.९.२०२२ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • 02187 रीवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद विशेष दि. २८.७.२०२२ पर्यंत प्रत्येक गुरुवारी चालण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २९.९.२०२२ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. या ट्रेन चालण्याचे दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

आरक्षण :

विशेष ट्रेन क्रमांक 02131 आणि 02188 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २१.७.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होईल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.