परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याला मुदतवाढ! मुंडेंनी दिली माहिती

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरता विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत 30 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी केली होती मागणी

या योजनेंतर्गत परदेशी नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यासाठी 18 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दिलेल्या मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे मुदत वाढ देण्याबाबत विनंती केली होती.

(हेही वाचाः प्लास्टिक पिशव्यांबाबत पर्यावरण मंत्र्यांची हाताची घडी, तोंडावर बोट!)

३० जून पर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश

त्यानुसार धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश देत ही मुदत 30 जून पर्यंत वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परदेश शिष्यवृत्ती साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जूनच्या आत आपले अर्ज दाखल करुन घ्यावेत, असे आवाहन समाज कल्याण आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

(हेही वाचाः वडाच्या फांद्या घेण्यासाठी महिलांची झुंबड! कुठे गेले पर्यावरण प्रेम?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here