वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ

40638

परिवहन आयुक्त (Transport Commissioner), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. त्याकरीता परिवहन विभागाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयासाठी M/s REAL MAZON INDIA LTD. या एजन्सीची नियुक्ती केली असून https://hsrpmhzone2.in हे HSRP बुकिंग पोर्टल असून दि.01 जानेवारी 2025 पासून हे काम सुरु झाले आहे.

(हेही वाचा – General strike in Italy : इटलीमध्ये देशव्यापी संपामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती)

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (Deputy Regional Transport Office), कल्याण कार्यक्षेत्रातील खाजगी वाहनधारक, बसधारक, ऑटोरिक्षाधारक, टॅक्सीधारक, ट्रकधारक तसेच कार्यरत संघटनांनी आपल्या वाहनांना लवकरात लवकर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसवून घ्यावी. परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या निर्देशानुसार एक ठिकाणी किमान 25 किंवा 25 पेक्षा जास्त दुचाकी चारचाकी / ऑटोरिक्षा/ टॅक्सी / बस / ट्रक मालकांनी HSRP बसविण्यासाठी अर्ज केल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये संबंधित एजन्सीमार्फत कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क न आकारता HSRP बसविण्यात येईल.

तसेच राज्यामध्ये जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (High security number plate) बसविण्याचे काम फारच कमी झाल्याचे निदर्शनास आले असल्याने हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.