लवकरच हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत धावणार

हार्बर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगावपर्यंत धावते. यामुळे अनेक लोकांना हार्बरमार्गावर जाण्यासाठी वांद्रे, अंधेरीवरून गाड्या बदलून प्रवास करावा लागत आहे. परंतु आता या लोकलचा बोरीवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी – अंधेरीदरम्यान हार्बर सेवा सुरू होती. परंतु प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन हार्बर सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला. २०१९ पासून गोरेगावरपर्यंत लोकल गाड्या धावू लागल्या याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर गोरेगावपर्यंत असलेली हार्बर सेवा बोरिवलीपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

( हेही वाचा : हवीहवीशी ती पु्न्हा झाली नकोशी; राज्यात मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण घटले)

हार्बर सेवा बोरिवलीपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय

हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यासाठी एमयूटीपी-३ अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या मार्गिकेदरम्यान मालाड, कांदिवली दोन स्थानके असून मालाड स्थानक उन्नत होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

बोरिवलीपर्यंत विस्तार केल्या जाणाऱ्या मार्गिकेचे जिओटेक तसेच ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कामाला मंजुरी मिळाल्यानंतर आणि राज्य सरकारकडूनही निधी प्राप्त होताच या मार्गितेच्या कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गिकेचे काम पूर्ण होण्यास साधारण तीन ते पाच वर्षे लागतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here