Income Tax भरण्याची अंतिम तारीख बदलणार? काय आहे सरकारचा निर्णय

129

आयकर विभागाकडून Income Tax भरण्यासाठी अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत करदाते Income Tax भरू शकतात. त्यामुळे या तारखेच्या आत करदात्यांना आयकर भरणे आवश्यक आहे. यासाठी आता आवघे काही दिवस शिल्लक असतानाच आता कर भरण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचबाबत सरकारकडून मोठं विधान करण्यात आलं आहे.

अंतिम तारखेबाबत काय आहे निर्णय?

कर भरण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ देण्याबाबत सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे महसूल सचिवांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे 31 जुलैच्या आतच करदात्यांना ITR भरणे आवश्यक असणार आहे. दिलेल्या मुदतीपूर्वी जर का आयकर भरला नाही तर करदात्यांना दंड भरावा लागू शकतो. कलम 234 A आणि 234 F अंतर्गत दंडासह करावरील व्याज देखील भरावं लागणार आहे.

(हेही वाचाः एका वर्षात बँकेत इतकी रक्कम जमा करताय? मग Income Taxच्या नियमात झालाय मोठा बदल)

15 जूनपासून सुरुवात

2022-23 या करनिर्धारण वर्षासाठी 15 जून 2022 पासून Income Tax Return भरण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन आयकर भरताना अनेकदा सर्व्हरवर लोड येऊन ते हँग होण्याच्या घटना घडतात. अंतिम तारीख जवळ आल्यानंतर या घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे वेळेत आयकर भरण्याचे आवाहन आयकर विभागाकडून करण्यात येते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.