- प्रतिनिधी
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या (Majhi Ladki Bahin Yojana) नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना ३० सप्टेंबर २०२४ अर्ज करता येईल. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी (२ सप्टेंबर) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.
(हेही वाचा – Mahayuti च्या कोणत्या जागांवर खरी रस्सीखेच, कुरघोडी होणार?)
राज्य सरकराने जून महिन्यात राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची (Majhi Ladki Bahin Yojana) घोषणा केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने १ जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु केली.
(हेही वाचा – Rabies Free Mumbai साठी आता शाळांमधून जनजागृती)
सरकारच्या या योजनेला राज्यभरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ अशी होती. ही मुदत संपल्याने योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांना मिळावा यासाठी अर्ज भरण्यास ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. (Majhi Ladki Bahin Yojana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community