SBI बॅंकेच्या ‘Wecare’ योजनेला मुदतवाढ! आता ३१ मार्च २०२३ पर्यंत करू शकता गुंतवणूक

129

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये अकाऊंट असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विशेष मुदत ठेव योजनेत पुन्हा एकदा वाढ केली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने त्यांची SBI Wecare विशेष ठेव योजना मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. ही योजना सुरूवातीला सप्टेंबर २०२० पर्यंत चालवली जात होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक व्याज दिले जात आहे.

‘SBI Wecare’  योजनेला मुदतवाढ 

ज्येष्ठ नागरिकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि  त्यानंतर आता बॅंकेने ज्येष्ठ नागरिकांसाठीची विशेष मुदत ठेव योजना ‘SBI Wecare’ ला ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सामान्य एफडीमधून मिळणाऱ्या व्याजाच्या तुलनेत ०.८० टक्के अधिक व्याज मिळेल. सध्या SBI या ठेवींवर जास्तीत जास्त ५.५० टक्के व्याज देत आहे.

( हेही वाचा : IRCTC Booking : आता चॅटबॉटद्वारे करता येणार रेल्वे तिकिटांचे बुकिंग)

एसबीआयची ज्येष्ठ नागरिक विशेष मुदत ठेव योजना SBI Wecare मध्ये पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या मुदत ठेवीवर ३० बेसिस पॉइंट्सचे अतिरिक्त व्याज उपलब्ध आहे. मुदत ठेवीवर बॅंकेकडून ५ वर्षांसाठी ५.६५ टक्के व्याज दिले जाते. एसबीआय बॅंक सामान्य नागरिकांना मुदत ठेवीवर २.९० टक्के ते ५.६५ टक्क्यांपर्यंत व्याज देते, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवलेल्या मुदत ठेवीवर बॅंक ३.४० टक्क्यांवरून ६.४५ टक्के व्याज देते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.