कोकणात जाताना नो टेन्शन! उन्हाळी विशेष गाड्यांना २५ मे पर्यंत मुदतवाढ

उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की, मुंबईतील चाकरमानी सहकुटुंबासह कोकणची वाट धरतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमदरम्यान उन्हाळी विशेष गाड्यांचे आयोजन केले होते. या विशेष गाड्यांना आता कोकण रेल्वेने मुदतवाढ दिली आहे.

( हेही वाचा : रेल्वे प्रवाशांच्या मदतीला धावणार कर्मयोगी! )

उन्हाळी विशेष गाड्या

  • गाडी क्रमांक 01045 ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ८, १०, १२, १४, १६, १८, २०, २२ आणि २४ मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01046 ही विशेष गाडी थिविम येथून दिनांक ९, ११, १३, १५, १७, १९, २१, २३ आणि २५ मे रोजी दुपारी ०२.१० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०५ वाजता पोहोचेल.

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड

संरचना : एक प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणी डबे

आरक्षण सुविधा

या गाड्यांची बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here