आरोग्य विभाग(Health Department) अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य विभागातील या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी २९ ऑगस्टपासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर होती.
या भरतीसाठी दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत (Health Department) रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबर २२०२३ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
(हेही वाचा –Best Bus : आता सार्वजनिक बाप्पांच्या दर्शनासाठी बेस्ट रात्रभर धावणार)
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधीही २२ सप्टेंबरच्या रात्री ११.५५ वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही आयुक्त आरोग्य सेवा (Health Department) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community