डिसेंबरमध्ये कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा!

141

डिसेंबर महिन्यात अनेक पर्यटन, नववर्षाचे स्वागत आणि ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यासाठी कोकण, गोव्याला जातात. यामुळे प्रवाशांच्या होणाऱ्या अतिरिक्त गर्दीचा विचार करून पर्यटकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने चार गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. गांधीधाम तिरुनेलवेली, भावनगर-कोचुवली, जामनगर ते तिरुनेलवेली तसेच हाप्पा-मडगाव एक्स्प्रेसला स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

( हेही वाचा : सामान्य नागरिकांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी स्वस्त होणार?)

  • गांधीधाम एक्स्प्रेस
    २८ नोव्हेंबर ते २९ डिसेंबर
  • भावनगर – कोचुवेली एक्स्प्रेस
    २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर
  • जामनगर तिरुनलवेली एक्स्प्रेस
    २ ते २७ डिसेंबर

मध्य रेल्वे मुंबई ते मडगाव विशेष शुल्कासह एकेरी विशेष ट्रेन चालवणार आहे

गाडी क्रमांक 01427 एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमळी.

संरचना : १५ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण : 01427 वन-वे स्पेशल ट्रेन साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २.१२.२०२२ रोजी सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे रेल्वेने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.