श्री मलंग गडावर महाआरतीत मुसलमानांचा हैदोस!

149

सालाबादाप्रमाणे यंदाही होळीच्या निमित्ताने २८ मार्च रोजी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्री मलंग गड येथे श्री मलंगबाबाच्या आरतीकरता हिंदू धर्मीय जमले होते. त्याठिकाणी विधिवत महाआरती सुरु असतानाच ५०-६० धर्मांध मुसलमानांनी मंदिरात घुसखोरी केली. आरती करणाऱ्या हिंदूंना धक्काबुक्की करत ‘अल्ला हु अकबर’ अशा घोषणा देत हैदोस घातला. परिणामी अनेक वर्षांची प्रथा खंडित झाली. हिंदूंना आरती अर्धवट सोडूनच गडावरून खाली उतरावे लागले. या विरोधात समीर भंडारी यांनी उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात रितसर लेखी तक्रार दाखल केली आहे.

काय आहे हे प्रकरण? 

  • प्रथेप्रमाणे २८ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने २५ हिंदू श्री मलंग गडावर आरती करण्यासाठी जमले होते. मात्र पोलिसांनी कोरोनाचे कारण देत केवळ ५ जणांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात आला.
  • अशा रीतीने पोलिसांच्या अटी शर्थीनुसार ५ हिंदूंनी या ठिकाणी महाआरतीला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी अचानक त्या ठिकाणी ५० ते ६० धर्मांध मुसलमान जमले.
  • त्यांनी एका बाजूला महाआरती सुरु असताना दुसऱ्या बाजूला धर्मांध मुसलमानांनी ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत आरती करणाऱ्या हिंदूंना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.
  • धर्मांध मुसलमानांनी प्रचंड गोंधळ घातल्याने हिंदूंना परत जाण्यास पोलिसांनी विनंती केली. पोलिसांच्या या विनंतीमुळे आरती अर्धवट सोडून हिंदू गडावरून खाली उतरले.
  • हा धर्मांध मुसलमानांचा पूर्वनियोजित कट होता. कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून मंदिरात घुसखोरी करून धुडगूस घालणाऱ्या मुसलमानांवर पोलिसांनी कारवाई केली नाही.
  • त्यामुळे या विरोधात समीर भंडारी यांनी उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात रितसर लेखी तक्रार दाखल केली. व्हिडीओ क्लिप दिल्या आणि संबंधित धर्मांध मुसलमानांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली.

हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संताप! 

दरवर्षी या ठिकाणी होळीच्या दिवशी महाआरतीच्या वेळी धर्मांध मुसलमान हिंदूंना विरोध करत असतात. त्यावेळी कायम पोलिसांकडून हिंदूंवरच दबाव आणला जातो. यंदाही याची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे घडल्या प्रकरणामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. जोवर या प्रकरणात संबंधितांवर कारवाई होत नाही तोवर पोलिसांवर दबाव आणण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा : एमआयडीसीचे सर्व्हर हॅक… काय आहे हॅकर्सची मागणी?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.