ऑस्ट्रेलियामधील (Australia) कैनबरा शहरमध्ये दि. २६ ऑक्टोबर रोजी तोंडावर कपडा बाधलेल्या कट्टरपंथींनी दोन हिंदू मंदिरांवर हल्ला केला आहे. या घटनेमध्ये त्यांनी मंदिरातील मूर्तींची तोडोफोड केली असून चोरी ही केली आहे. यामध्ये शिवलिंगाचे आणि अन्य मूर्तींचे नुकसान झाले आहे. (Australia)
( हेही वाचा : J&K Attack: जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये लष्कराच्या रुग्णवाहिकेवर हल्ला!)
ऑस्ट्रेलियामधील (Australia) एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चार कपडाधारी हल्लेखोर एका कारमधून हिंदू मंदिर आणि सांस्कृतिक केंद्राजवळ पोहचले. कट्टरपंथींनी मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून मंदिरातील चार दानपेट्या पळवल्या. यातील एका दानपेटीचे वजन २०० किलोच्या आसपास होते. त्यात हजारो डॉलर पैसे होते. हा हल्ला कैनबरामध्ये दिवाळी मेळ्याच्या दिवशीच झाला. (Australia)
मंदिराचे उपाध्यक्ष तरुण अगस्ती यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, या घटनेमुळे आम्ही दुखी आणि चिंतीत आहोत. हा आमच्या पूजनीय स्थळांचा आणि समाजाचा मोठा अपमान आहे. त्यामुळे हिंदू समाजाला आम्ही सांगू इच्छितो की, स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत. तसेच त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Australia)
हेही पाहा :