Eye Flu : डोळे आल्यावर करा ‘हे’ ४ उपाय

266

गेल्या काही दिवसांपासून आय फ्लू म्हणजे डोळ्यांची साथ पसरली आहे. डोळ्यांना वेदना होणे तसेच लालसर डोळ्यांमधून चिकट स्त्राव येत राहणे यांसारख्या समस्या जाणवत आहेत. अनेकांना वेदनाही होत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. डोळ्यात जळजळ, वेदना किंवा खाज सुटणे ही सर्व डोळ्यांच्या फ्लूची लक्षणे आहेत.

डोळे ‘या’ पाण्याचे स्वच्छ करा

रात्री एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा त्रिफळा पावडर टाकून भिजत ठेवा. सकाळी ते पाणी उकळून घ्या आणि पाणी अर्ध झालं की ते पाणी चांगल गाळून घ्या. आय कप्समध्ये टाकून डोळा स्वच्छ करू शकता. महत्वाचं म्हणजे दोन्ही डोळ्यांना वेगवेगळे आय कप घ्यावेत. तसंच दिवसातून हे एक ते दोन वेळा करावे. महत्वाचं म्हणजे एकावेळी जवळपास १५ ते २० वेळा डोळे उघडझाप करावी.

​त्रिफळा पेस्ट

एक चमचा त्रिफळा पावडर घेऊन त्यामध्ये थोडंस पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट पापण्यांच्या वर लावा. यामुळे डोळ्याला गारवा मिळेल. त्रिफळा पेस्टमुळे आय फ्लूमुळे डोळ्यांची होत असलेली जळजळ थांबेल आणि थंड वाटेल. ही पेस्ट २० ते ३० मिनिटे डोळ्यावर ठेवू शकता. या दरम्यान पेस्ट सुकल्यावर तुम्ही डोळे उघडू शकता.

(हेही वाचा PM Narendra Modi : विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ – नरेंद्र मोदी)

​गुळवेल

गिलॉय म्हणजेच गुळवेलच्या दोन गोळ्या दिवसातून एकदा घ्या. ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे थांबेल आणि आराम मिळेल. गुळवेलमुळे डोळे आले असतील तर ते पूर्ण बरे होतात.

हा कापूस डोळ्यांवर ठेवा

एक हळकुंड स्वच्छ दगडी सानेवर उगाळून घ्या. हळद उगाळण्यासाठी तुरटी फिरवलेल्या पाण्याचा वापर करा. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे याचा फायदा होतो. तुरटी फिरवलेल्या पाण्यात कापसाचा बोळा भिजवून घ्या आणि त्या कापसाला उगाळलेली हळद लावून घ्या. हा कापसाचा बोळा डोळ्यावर ठेवा. हा कापूस रात्रभर डोळ्यावर ठेवा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.