अंधत्व व दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रमातंर्गत राज्यात विनाशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतंर्गत तीन वर्षांत सार्वजनिक आरोग्य विभागाने २५ लाख ६९ हजार ७५३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय नेत्रज्योती अभियान ही विशेष मोहीम जून २०२२ पासून राबवण्यात येते. या मोहिमेत ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांमध्ये अंधत्व तसेच गंभीर दृष्टिक्षीणता (एसव्हीआय) कारणीभूत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. (Eye Surgery)
(हेही वाचा – मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी दिला जाणार; Jaykumar Gore यांची घोषणा)
या कार्यक्रमांतर्गत सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या तीन वर्षांत २७ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट राज्याला देण्यात आले होते. त्यानुसार २४ डिसेंबरपर्यंत २५ लाख ६९ हजार ७५३ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ७,५१,५०७ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून एकूण उद्दिष्टाच्या ७० टक्के शस्त्रक्रिया केल्या. या कालावधीत १० लाख ८७ हजार इतक्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. (Eye Surgery)
(हेही वाचा – ७१ वर्षांनी आला अभूतपूर्व योग; Nashik Kumbh Mela २८ महिने चालणार)
अंधत्वाचे प्रमाण घटले
२०१५-२०१९च्या केंद्र सरकारच्या सर्वेक्षणानुसार अंधत्वाचे प्रमाण हे २००६-०७ या आर्थिक वर्षात १.१ टक्क्यांवरून सन २०१९-२० या आर्थिक वर्षात ०.३६ टक्के इतके कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. २०२२-२३ मध्ये ८ लाख ७३ हजार ५१३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर २०२१-२२ मध्ये ही संख्या ५ लाख ५१ हजार ०३४ इतकी होती. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय धोरणामध्ये नमूद केल्यानुसार २०२५ पर्यंत हे प्रमाण ०.२५ टक्क्यापर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात सध्या ६९ नेत्रपेढ्या, ४६ नेत्रसंकलन केंद्र, २०१ नेत्रप्रत्यारोपण केंद्रे कार्यरत आहे. तसेच ९३ सार्वजनिक नेत्र शस्त्रक्रियागृह तसेच ११० अशासकीय स्वयंसेवी संस्था कार्यान्वित आहेत. (Eye Surgery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community