Facebook आणि Instagram app पुन्हा सुरू; डाऊन होताच जगभरातील नेटकऱ्यांनी पाडला मिम्सचा पाऊस

अखेर मंगळवारी रात्री उशिरा हे दोन्ही aap पुन्हा सुरळीत सुरू झाले. मात्र तोवर x युजर्स ने Facebook आणि Instagram युजर्सची चांगलीच खिल्ली उडविली.

239

सोशल मीडियाच्या काळात जगभरात दोन जणांची स्पर्धा चुरशीची असते, Facebook, Instagram   असलेल्या meta प्लॅटफॉर्मचा मालक मार्क झुकरबर्ग आणि दुसरे आताचे x आणि पूर्वीचे ट्विटरचा मालक अलोन मस्क यांच्यात ही स्पर्धा असते. सर्वाधिक युजर्स कुणाचे यावरून कायम या प्लॅटफर्मवरील नेतकऱ्यांमध्येच वाद विवाद होत असतात. अशावेळी जर यातील कोणता प्लॅटफॉर्म अर्थात aap डाऊन झाले होते, तर मात्र त्यावर विविध मिम्स करून टीकेची झोड उगारली जाते. असेच बरेचसे मिम्स मंगळवार, ५ मार्चपासून Facebook आणि Instagram बाबत x युजर्स टाकत होते, आता हे दोन्ही app पुन्हा सुरू झाले तरी x वर Facebook आणि Instagram हे दोन्ही app पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहेत.

(हेही वाचा Sandeshkhali Case : सरकार पुरस्कृत महिला बलात्काराच्या घटना लज्जास्पद; अभाविपकडून मुंबई विद्यापीठ परिसरात निदर्शने)

सरसकट सगळ्यांचे अकाउंट आपोआप लॉग आऊट

मंगळवार नेटकऱ्यांसाठी थोडा चिंतेचा होता. विशेषतः जे Facebook आणि Instagram वर सतत पडून असतात अशा युजर्ससाठी हा दिवस अक्षरशः अस्वस्थ करणारा निघाला, कारण सरसकट सगळ्यांचे अकाउंट आपोआप लॉग आऊट झाले होते. पुन्हा पुन्हा पासवर्ड टाकला तरी तो स्वीकारला जात नव्हता, तो चुकीचा असल्याचे सांगितले जात होते.

यामुळे आपले अकाउंट हॅक झाले की काय, या चिंतेने वापरकर्ते चिंतेत आले होते. अखेर रात्री उशिरा हे दोन्ही aap पुन्हा सुरळीत सुरू झाले. मात्र तोवर x युजर्स ने Facebook आणि Instagram युजर्सची चांगलीच खिल्ली उडविली. त्यांच्यावर टीका करणाऱ्या मिम्सचा पाऊस पाडला.

तसेच Facebook आणि Instagram युजर्स नेही तेवढा काळ x चा आधार घेतला, ज्यामुळे x युजर्सने त्यांना चांगलेच  झोडपले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.