फेसबुक आपलं मूळ नाव बदलणार या विषयी गेले अनेक दिवस चर्चा चालू होती. या चर्चा ख-या ठरल्या असून समाजमाध्यमांतील आघाडीचा प्लॅटफॉर्म असणा-या फेसबुकने आपल्या नावात बदल केला आहे. यापुढे फेसबुक आता ‘मेटा’ (Meta) या नावाने ओळखले जाणार आहे. फेसबुकचे जगभरातील अब्जावधी यूजर्स आता मेटाचे यूजर्स होणार आहेत.
मार्क झुकरबर्ग यांनी केली घोषणा
फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी कंपनीच्या वार्षिक सभेत जाहीर केले की, मूळ कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ असे केले जात आहे. जेणेकरुन त्याच्या समस्याग्रस्त सोशल नेटवर्कच्या पलीकडे भविष्याचे प्रतिनिधित्व केले जाईल. या प्रक्रियेला रिब्रॅण्डिंग असेही म्हटले जात आहे. कंपनी सोशल मीडिया सोबत एम्बेडेड इंटरनेट या संदर्भात काम करेल यामुळे वास्तविक व आभासी जग एकत्र येण्यास मदत होईल.
Announcing @Meta — the Facebook company’s new name. Meta is helping to build the metaverse, a place where we’ll play and connect in 3D. Welcome to the next chapter of social connection. pic.twitter.com/ywSJPLsCoD
— Meta (@Meta) October 28, 2021
२००५ मध्ये नाव बदललं होतं
अमेरिकेत फेसबुकचा हिंसाचार पसरवण्यासाठी वापर होतो, असा आरोप झाल्यानंतर फेसबुकचे नाव बदलण्यात आले. फेसबुकचे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी कंपनीला ‘मेटा’ हे नाव सुचवले होते. यापूर्वी फेसबुकने २००५ मध्ये असेच काही केले होते, तेव्हा कंपनीने आपले नाव ‘द फेसबुक’ वरून ‘फेसबुक’ असे बदलले होते. जगभरात ३ अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात. त्याचवेळी, भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या ४१ कोटी आहे.
Join Our WhatsApp Community