जगभरात फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामला (Instagram) अडचण आली आहे. वापरकर्त्याचे फेसबुक, इंस्टाग्रामचे अकाऊंट आपोआप लॉगऑऊट झाले आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम देखील डाऊन आहे. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असा संदेश येऊन अकाऊंट आपोआप लॉगऑऊट होत आहेत. (Facebook Instagram Down)
(हेही वाचा – Mechanized Parking : वरळी हबच्या ठिकाणी बांधले जाणार सुमारे ७५० वाहनांसाठी यांत्रिकी वाहनतळ)
पासवर्डही नाकारला
फेसबुक आणि इंस्टाग्रामचे अकाऊंट पुन्हा लॉग-इन केल्यानंतर पासवर्डही नाकारला जात आहे. आपला पासवर्ड चुकीचा नसला, तरी फेसबुकच्या होम पेजवर जाण्याऐवजी Facebook तुम्हाला आपोआप बाहेर काढेल. फेसबुकवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यावर ‘तुमचा लॉग इन आयडी कालबाह्य झाला आहे’ असा एरर मेसेज दिसत आहे. पुन्हा पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जातील.
लॉग आऊट परिणाम इंस्टाग्राम, तसेच मेसेंजरवरही होत आहे. तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही. सध्या फक्त सेवा खंडित आहेत. फेसबुक यावर अधिकृत उत्तर देणार आहे. (Facebook Instagram Down)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community