500 आणि 2000 रुपयांच्या खोट्या नोटा वाढ झाल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे खोट्या नोटांच्या बाबतीत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आरबीआयकडून देण्यात आला आहे. पण याबाबतच आता अनेक अफवा देखील पसरवण्यात येत आहेत. 500 रुपयांच्या नोटा खोट्या असल्याचा दावा करणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत सरकारच्या फॅक्ट चेक विंगने याचबाबत एक खुलासा केला आहे.
व्हायरल फोटोतला दावा
500 रुपयाच्या नोटेवर एक उभी हिरवी पट्टी आपल्याला दिसते. 500 च्या ज्या नोटेवर ही उभी पट्टी गांधींच्या फोटोशेजारी आहे ती नोट खोटी असल्याचा दावा या व्हिडिओमधून करण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नरच्या सहीच्या शेजारी जर ही हिरवी पट्टी असेल तरच ती नोट खरी असल्याचेही या फोटोतून सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः बँक खातेधारकांसाठी अमित शहांची मोठी घोषणा, होणार मोठा फायदा)
एक मैसेज में यह दावा किया जा रहा है कि ₹500 का वह नोट नकली है जिसमें हरी पट्टी आरबीआई गवर्नर के सिग्नेचर के पास ना होकर गांधीजी की तस्वीर के पास होती है।#PIBFactCheck
➡️यह दावा फ़र्ज़ी है।
➡️@RBI के अनुसार दोनों ही तरह के नोट मान्य होते हैं।
🔗https://t.co/DuRgmRJxiN pic.twitter.com/nGamCYOZp8
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 29, 2022
हा दावा खोटा
पण पीआयबी फॅक्ट चेक विंगने हा दावा खोट्या नोटांबाबतीतला हा दावाच खोटा ठरवला आहे. 500 ची नोट तपासण्यासाठी अशाप्रकारे कुठलाही निकष लावला जात नाही, असे पीआयबी फॅक्ट चेक विंगकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही नोटा ख-याच असल्याचे पीआयबी फॅक्ट चेक विंगने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community