Fact Check: ईव्हीएमविरोधातील आंदोलनाचा व्हायरल व्हिडिओ नऊ महिन्यापूर्वीचा; व्हिडिओ महाराष्ट्राचा नव्हे तर दिल्लीचा

125
छायाचित्र सौजन्य : विश्वास न्यूज
Fact Check: ईव्हीएमविरोधातील आंदोलनाचा व्हायरल व्हिडिओ नऊ महिन्यापूर्वीचा; व्हिडिओ महाराष्ट्राचा नव्हे तर दिल्लीचा

Claim Review : समाजमाध्यमांवर एका रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ईव्हीएम (EVM) हटवण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत, असा दावा काही समाजमाध्यम युजर्सकडून केला जात आहे.

Claimed By : सोशल मीडिया युजर्स
Fact Check : दिशाभूल
Created By : विश्वास न्यूज
Translate By : हिंदुस्थान पोस्ट मराठी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. समाजमाध्यमांवर एका रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ईव्हीएम (EVM) हटवण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत, असा दावा काही समाजमाध्यम युजर्सकडून केला जात आहे. तसेच हा व्हिडिओ महाराष्ट्रातील ईव्हीएम (EVM) विरोधातील आंदोलनाचा असल्याचे ही युजर्सनी सांगितले. (Fact Check)

( हेही वाचा : Fact Check : विदेशासारखा ब्रिज उत्तर प्रदेशमध्ये, फोटो व्हायरल; काय आहे सत्यता?

मात्र विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा व्हायरल व्हिडिओ जाने(Fact Check)वारी २०२४ मधील दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाचा आहे. याचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही.

व्हायरल पोस्टमध्ये काय आहे?

फेसबुक युजर्स राजेश कुमार सिंघानिया (Rajesh Kumar Singhania) यांनी दि. २७ नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “ही गर्दी पाहून असं वाटतंय की जनता महाराष्ट्रात चोरी करून तयार झालेल्या नवीन सरकारला स्थापनच होऊ देणार नाहीत. EVM विरोधातील ही गर्दी खूप मोठी आहे.” (Fact Check)

सत्यता पडताळणी

व्हायरल व्हिडिओमध्ये ‘ईव्हीएम हटवा-देश वाचावा’ अश्या घोषणा ऐकायला येत आहेत. याच्या आधारावर कीवर्डद्वारे शोध घेतल्यावर दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी Special India News यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ मिळाला. यामध्ये सुरुवातीला व्हायरल व्हिडिओ दिसतो. या व्हिडिओत माहिती दिली आहे की दिल्लीत जंतर-मंतर येथे ईव्हीएमच्या विरोधात हे आंदोलन झाले आहे. दि. १ फेब्रुवारीला ट्विटरवर ॲड. सुजित पासी (Adv. Sujit Passi) यांनीही व्हायरल व्हिडिओ अपलोड केला आहे. (Fact Check)

दरम्यान जय भीम गुजरात यूट्यूब चॅनेलवर दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी या आंदोलनाचा दुसरा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यामध्येही याच घोषणा ऐकायला येत आहेत. व्हिडिओत दिल्लीत जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाचा उल्लेख आहे. व्हायरल व्हिडिओमधील लोकेशन या व्हिडिओत देखील दिसते. यावरून असे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ जवळपास ९ महिन्यांपूर्वीचा आहे. (Fact Check)

(सदर फॅक्ट चेक विश्वास न्यूज या वेबसाईटने प्रसिद्ध केलं आहे. ‘शक्ती कलेक्टिव्ह’चा भाग म्हणून ‘हिंदुस्थान पोस्ट’ने त्याचा अनुवाद केला आहे)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.